नवी दिल्ली – भाजपचे खासदार आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टन बनले आहेत. २०१६ मध्ये टीएमध्ये लेफ्टनंट झालेल्या अनुराग ठाकूर यांची पदोन्नती झाली आहे. टीएमध्ये पद मिळवणारे अनुराग ठाकूर हे पहिले खासदार आणि मंत्री ठरले आहेत. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर इथले खासदार आहेत. कॅप्टन झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
जुलै २०१६ मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट झालो होतो. मला गर्व आहे, की माझी कॅप्टनपदी पदोन्नती झाली. मी लोकांची सेवा आणि भारतमातेच्या ध्वजाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं त्यांनी ट्विट केलं. कॅप्टनची वर्दी घालून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली.
https://twitter.com/Anurag_Office/status/1369635721129041920