चेन्नई – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा खून करणारा एलटीटीईचा संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरन हा क्वचितच कोणाच्या विस्मरणात जाईल. आपल्याच देशाच्या माजी पंतप्रधानाला मारणाऱ्या या माणसाबाबत कोणाच्याही मनात चीड असू शकते. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच माणसाचे कटआऊट्स दाखवून तामिळनाडूत मते मागितली जात आहेत.
आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. तामिळनाडूत ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम (एलटीटीई) या संस्थेचे संस्थापक प्रभाकरन याचे पोस्टर्स दिसले. आजही प्रभाकरनबद्दल येथील जनतेत असलेली दहशत या माध्यमातून दिसते आहे. म्हणूनच त्याच्या नावावर आजही मते मागितली जात आहेत.
पुदुकोट्टई जिल्ह्यातील थिरुमायम मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या तमिलर कात्चीच्या (एनटीके) शिव रमन यांनी प्रभाकरनच्या कटआऊट्सचा उपयोग केला. त्यांच्यासोबतच सेंथमीजहान सेमै न, थिरुमावलवन यांनी देखील प्रभाकरनच्या फोटोचा आधार घेत मतांची मागणी केली आहे. एमडीएमके उमेदवार देखील याच फोटोंचा आधार घेऊन मते मागत आहेत.तामिळनाडूत ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून २ मेे रोजी मतमोजणी होणार आहे. एलटीटीईचा सर्वेसर्वा असलेल्या प्रभाकरन याचा मृत्यू १८ मे २००९ रोजी श्रीलंकेत झाला.
(फोटो – साभार प्रमोद चतुर्वेदी, एएनआय)