मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माता संजय खान यांनी एकेकाळी अफलातून नाव कमावले आहे. १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. मात्र एका घटनेमुळे संजय खान यांची चांगलीच चर्चा झाली होती. त्यांनी एका पार्टीत अभिनेत्री झीनत अमानला चांगलेच झोडपले होते.
‘अब्दूल्लाह’ चित्रपटाच्या वेळी संजय खान आणि झीनत अमान जवळ आले. त्यावेळी संजय खान विवाहित होते आणि त्यांना तीन मुलेही होती. एक दिवस झीनत अमान लोणावळा येथे शुटींगमध्ये व्यस्त असताना संजय खान यांनी फोन करून तिला तातडीने मुंबईल येण्यास सांगितले. ‘अब्दूल्लाह’च्या एका गाण्याचे पुन्हा शूट करायसाठी तिने मुंबईत यावे अशी संजय खान यांची इच्छा होती. मात्र आपण पहिलेच एका चित्रपटासाठी तारीख दिलेली आहे, असे झीनत म्हणाली. त्यावर संजय खान यांना राग आणि त्यांनी झीनतवर चित्रपट निर्मात्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. त्यावर झीनत नाराज झाली. त्यानंतर ती थेट संजय खानच्या घरी पोहोचली तेव्हा तिला कळले की संजय तर हॉटेल ताजमध्ये पार्टी करतोय. झीनतने ताज हॉटेल गाठले. तिथे तिला अचानक बघून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. संजय खान यांनी झीनतला इथे काय करतेय, असे विचारले. त्याठिकाणी संजय यांची पत्नी झरीनही तिथेच होती. तिलाही हा प्रकार आवडला नाही. थोड्यावेळाने संजय झीनता एका खोलीत घेऊन गेले आणि त्याठिकाणी जे काही झाले त्याचा कधी झीनत अमानने विचारही केलेला नव्हता. संजय खानने झीनचे केसं पकडून तिला खूप झोडपले. खूप वेळ हा प्रकार सुरू होता. त्यानंतर काही वेळाने संजय यांची पत्नी झरीन तिथे पोहोचली आणि तिनेही झीनतला झोडपायला सुरुवात केली. सर्व पाहुण्यांना खोलीत काय सुरू आहे, हे माहिती होते, मात्र कुणीही मधे पडले नाही. हॉटेल स्टाफने रक्तबंबाळ झालेल्या झीनतला सावरले. या जखमा बऱ्या होण्यासाठी झीनतला ८ वर्षे लागली. तरीही तिने संजय खानविरुद्ध तक्रार दाखल केली नाही. ती संजयच्या प्रेमातच होती.