मुंबई – जगात असे अनेक हॉटेल्स आहेत ज्यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी किंवा सुंदरतेसाठी ओळखले जाते. काही हॉटेल्स त्यांच्या भव्यतेसाठीसुद्धा ओळखले जातात. मात्र तुम्ही अश्या हॉटेल बद्दल ऐकले आहे का जेथे केवळ कूस बदलताच आपण एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन पोचतो? होय. हे सत्य आहे. आणि या हॉटेल चे नाव आहे अर्बेज हॉटेल.
या हॉटेल ला अर्बेज फ्रांको-सुइसे हॉटेल या नावानेसुद्धा ओळखले जाते. फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन देशांच्या सीमेवर ला क्योर भागात हे हॉटेल आहे. अर्बेज हॉटेल दोन्ही देशांमध्ये येत असल्यामुळे या हॉटेल चे दोन पत्ते आहेत.
फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन देशांची सीमा अर्बेज हॉटेलच्या अगदी मधोमध आहे. त्यामुळे साहजिकच हॉटेल मध्ये जाणारे लोक एका देशातून दुसऱ्या देशात क्षणार्धात पोचतात. हॉटेल च्या सर्व खोल्यांचे विभाजन २ भागांत केले गेलेले आहे. खोलीतील बेड्सची रचना अश्या प्रकारे केली गेली आहे, की बेड चा अर्धा भाग फ्रान्स मध्ये आणि अर्धा स्वित्झर्लंड मध्ये येतो. बेड्स वरील उशांची रचना सुद्धा दोन्ही देशांतील परंपरे नुसार वेगवेगळ्या प्रकारे केली गेली आहे.
प्रस्तुत हॉटेलची इमारत ही १८६२ मध्ये बांधली गेली होती. पूर्वी त्याठिकाणी एक किराण्याचे दुकान असायचे. नंतर १९२१ साली जुल्स जीन अर्बेजे नावाच्या एका व्यक्तींने ही इमारत खरेदी केली आणि या ठिकाणी हॉटेल सुरु केले. आज हे हॉटेल फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांची ओळख बनलेले आहे.
हॉटेलची ही काही छायाचित्रे