मुंबई – बेडकाचे विष घेणाऱ्याला पुढील एक मनिटाच्या आत खूप जास्त ताप आणि एलर्जी झाल्यासारखे वाटते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इरिटेशनचा अनुभव त्याल येतो. उलटी होईल असे सतत वाटत असते आणि उलटी होते देखील.
बेडकाचे विष घेणाऱ्याला त्याच्या शरीरातील सर्व अपायकारक तत्वच नाहिसे झाल्यासारखे वाटते असे नाही तर मानसिक आघातही कमी झाल्यासारखे वाटू लागते. एका कंपनीत कार्यरत ३९ वर्षीय माध्यम सल्लागार ज्युलिया एलिसन आपल्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा भयावह असा अनुभव असल्याचे सांगते. त्याचवेळी त्याचा पुन्हा एकदा अनुभव घ्यायची इच्छा असल्याचेही म्हणते, याचे आश्चर्य आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये आदिवासी बेडकाच्या विषाचा वापर लस म्हणून करतात. मात्र आता हे सॅनफ्रान्सिस्कोसारख्या अनेक शहरांमध्ये आणि देशांमध्ये उच्चभ्रूंमध्ये झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले आहे.
बेडकाच्या त्वचेतून येते विष
बेडकाचे विष एखाद्या डिंकासारखे दिसते. त्याला कंबो म्हणून संबोधले जाते. विशेषतः ते मंकी फ्रॉगच्या त्वचेवरून प्राप्त होत असते. वैज्ञानिक मंडळी या बेडकाला ‘फायलोमेडूसा बायकलर’ या नावाने संबोधतात. आदिवासींमधील बऱ्याच प्रजाती विविध आजारांवर उपाय म्हणून या विषाचा वापर करतात. अमेझॉन फॉरेस्टमध्ये या बेडकाला त्याच्या आवाजावरून शोधले जाते. त्यानंतर त्याला पकडून आगीच्या जवळ ठेवले जाते. जेणेकरून तो घाबरेल आणि विष काढेल. त्याच्या त्वचेमध्ये सुई घुसवून विष काढले जाते. हे विष ज्याला द्यायचे आहे त्याच्या हाताचा कोपरा, खांदा किंवा टाचेच्या छोट्या भागावर जळणारा कोळसा ठेवला जातो. त्यानंतर तिथे तयार झालेल्या पापुद्रा हटवून त्याठिकाणी बेडकाच्या विषात बुडविलेली सुई ठेवली जाते. या एका सुईची किंमत मोठ्या शहरांमध्ये ११ हजार रुपये आहे हे विशेष.