नवी दिल्ली – जगातील सर्वात शक्तीशाली काय आहे तर ते मिसाईल असे उत्तर कुणीही देईल. मात्र, मिसाईल हे सर्वाधिक घातक नसून चक्क मोबाईल आहे. जगभरातील विविध देशांमधील सोशल मीडियावर होणाऱ्या दुष्परिणामांचा संदर्भ देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आता मोबाईल फोन हा मिसाईल क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त घातक वाटत आहे.
देशाची सुरक्षा धोक्यात
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी असा इशारा दिला की, भविष्यात विविध प्रकारच्या माध्यमांमुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते. कारण काळ बदलल्यामुळे धमक्या आणि युद्धांचे स्वरूपही बदलत आहे. भविष्यात, सुरक्षिततेशी संबंधित इतर विषय आपल्याकडे येऊ शकतात. सिंह पुढे म्हणाले की, यापूर्वी अशी कल्पनाही केली नव्हती अशा प्रकारे संघर्ष हळूहळू ‘व्यापक’ होत आहेत.
सीमा न ओलांडता
कदाचित सोशल मीडिया आणि मोबाईल अॅप्सच्या परिणाम हा अग्निबाण क्षेपणास्त्राच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. कारण शत्रू आता कोणतीही सीमा ओलांडल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे आपण या धोक्यांपासून सावध राहिले पाहिजे आणि चुकीचे आणि दिशाभूल करणार्या माहितीपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण केले पाहिजे.