नवी दिल्ली – येत्या मार्चपासून जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा चलनात येणार नाहीत. या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर बाजारातून म्हणजेच वापरातून बाद करण्यात येतील, अशी माहिती आरबीआयचे अधिकारी बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे.
नोटाबंदी या शब्दाचा धसका यापुर्वी बहुतांश भारतीयांनी घेतला आहे. त्यामुळे या याचा थेट परिणाम सर्वांवर होऊ शकतो. परंतु आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सर्व १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा मागे घेण्याच्या योजनेवर टप्प्याने काम सुरु केले आहे, जेणेकरून लोकांना यापुढे त्रास होणार नाही. रिझर्व्ह बँकेने मार्च-एप्रिलमध्ये सदर पैसे परत घेण्याच्या विचारात घेतल्यामुळे १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनात यापुढे येणार नसल्याची माहिती आरबीआयने दिली. तथापि, नवीन १०० आणि १० रुपयांच्या नोटा यापूर्वीच प्रचलित आहेत आणि यापुढेही राहणार आहेत.
१०० रुपयांची नवीन नोट बाजारात आधीच प्रचलित आहे. त्या आरबीआयने २०१९ मध्ये चलनात आणल्या होत्या. त्यात अचानक ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यामुळे अनागोंदी पसरली होती, आणि लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तसेच आरबीआयने १० रुपयांच्या नाण्यांबाबत कोणत्याही प्रकारची अफवा टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच १० नाणी पूर्णपणे वैध आहेत.