मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण असलेली अभिनेत्री शमिता शेट्टी हिला आता लग्न करायचे आहे. सध्या तिचे वय ४२ वर्षे आहे. मोहब्बते या चित्रपटाद्वारे ती गाजली होती. मी लग्न करु इच्छिते. माझ्यासाठी मी नवरा शोधते आहे. मला असा नवरा हवा आहे की जो मला खुप आनंदात ठेवेल. असा व्यक्ती अद्याप मला भेटलेला नाही. पण, तुम्हाला असा कुणी माहित असेल तर मला कळवा, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.