मुंबई – गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर चक्क विषप्रयोग झाला होता. तशी माहिती खुद्द लता दीदींनीच दिली आहे. या घटनेबद्दल कुणालाही, काहीही माहित नाही. मंगेशकर कुटुंबिय याबाबत काहीही बोलत नाहीत. बॉलिवुड हंगामा या वेबसाईटला लता दीदींनी मुलाखत दिली असून त्यात ही बाब समोर आली आहे.
१९६३ मध्ये एक घटना घडली. त्यावेळी लता मंगेशकर यांचे नाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या आवाजामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. लता दीदी म्हणाल्या की, त्याच वर्षी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून होते. मला प्रचंड अशक्तपणा आला होता. उठून चालण्याचे त्राणही माझ्यात उरला नव्हता. मी चालू शकेन की नाही आणि आयुष्याबाबतच मला साशंकता वाटू लागली होती, असे दीदी म्हणाल्या. या प्रकारामुळे दीदींचा रियाज पूर्ण थांबला होता. त्यावेळी अनेक अफवाही पसरल्या होत्या. फॅमिली डॉक्टर आर. पी. कपूर यांनी दीदींची खुप काळजी घेतली. त्यामुळे त्या या संकटातून बाहेर पडल्या. माझ्यावर विषप्रयोग कुणी केला हे आम्हाला माहित होते. पण, त्यासंबंधीचा कुठलाही पुरावा नव्हता. त्यामुळे आम्ही त्याबाबत कुधीही, केव्हाही, काहीही बोलत नाहीत. विषप्रयोगामुळे तीन दिवस मी पूर्णपणे बेशुद्ध होते, असेही लता मंगेशकर यांनी सांगितले.