पुणे – राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांनी विजय आणि २ जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्र बदलत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले की, एकत्र काम केल्याने त्याचे फळ मिळते. वर्षभरात राज्य सरकारने अनेक चांगली कामे करुन दाखविली आहेत. त्यामुळेच जनतेने साथ दिली आहे. नागपूरला कायम भाजपचा उमेदवार विजयी होत होता. आता तिथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीला स्विकारते आहे, असे पवार म्हणाले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि जनतेचे आभार पवार यांनी यावेळी मानले आहेत.