नवी दिल्ली – केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करीत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यानंतर आता आणखी एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांद्यावर ही बंदी कायम ठेवताना कर्नाटकमधील बंगलोर राज आणि आंध्र प्रदेशातील कृष्णपूरम या कांद्यांच्या निर्यातीला मात्र हिरवा कंदिल दिला आहे. येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत या दोन्ही कांद्याच्या प्रजातींची १० हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस सरकारने मुभा दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. केंद्र सरकार या प्रश्नी राजकारण करीत असून शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रीया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात पुन्हा उग्र आंदोलने होण्याची चिन्हे आहेत.