नवी दिल्ली – अनेकदा आपण पाहतो, प्रचंड मेहनत करूनही आपल्या मनासारखं काहीच घडत नाही. मग आपण निराश होतो, कशातच काही राम नाही असं आपल्याला वाटतं. यासाठी अनेकजण वास्तूदोष हे कारण सांगतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, की आपली चप्पल किंवा बूट यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यावरूनही समोरच्या व्यक्तीबाबत अनेक अंदाज लावले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या पत्रिकेतील आठवा भाग हा त्याच्या पायाच्या तळव्यांशी जोडलेला असतो. यामुळेच तुम्ही जर याची काळजी घेतलीत, तर न जाणो तुमचे प्रयत्नही यशस्वी होतील. यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.
-
कोणालाही कधीही चप्पल, बूट भेट म्हणून देऊ नका किंवा घेऊही नका.
-
तुम्ही नोकरी शोधत असाल तर इंटरव्ह्यूसाठी जाताना कधीही जुने किंवा फाटलेले बूट घालून जाऊ नका. ते तुमच्याबद्दल वाईट मत निर्माण करू शकतं.
-
ऑफिसमध्ये कोणत्या रंगाचे बूट घालता, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
-
आपले बूट किंवा चप्पल नेहमी स्वच्छ, चमकदार असायला हवेत. याचंही बरं वाईट इम्प्रेशन समोरच्यावर पडत असतं.
-
बाहेरून घरी आलात की, चपला वाट्टेल तशा फेकण्याची अनेकांना सवय असते. पण त्यानेही अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. अशा लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
-
घरात चप्पल ठेवण्यासाठी वेगळी जागा असायला हवी. आणि ती वास्तुशास्त्रानुसार दक्षिण, दक्षिण – पश्चिम, उत्तर – पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असावी.
-
यातून आम्ही कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत नाही. यातील अनेक गोष्टी म्हणजे केवळ व्यवस्थितपणा आहे. माहितीसाठी म्हणून हे सांगितलेले आहे.