नवी दिल्ली – बालाकोटवर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाले होते, असा कबुलीजबाब पाकिस्तानच्या माजी वरिष्ठ अधिकारी मुत्सद्दी आगा हिलाली यांनी एका टीव्ही कार्यक्रमात दिला आहे.
एका टीव्ही चर्चेत नियमितपणे सहभागी होणाऱ्या आगा हिलाली म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि सैन्य युद्धासारखे वागत होते, तसेच पुलवामा हल्ल्याच्या बदल्यात भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला केला. त्यात किमान ३०० दहशतवादी ठार झाले. आमचे ध्येय त्यांच्यापेक्षा वेगळे होते. याउलट इम्रान सरकारने हवाई हल्ल्यात आमचा एकही माणूस ठार मारला नाही, असा दावा केला आहे. तसेच आम्ही केलेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर होती, असे म्हटले आहे. पाकिस्तानी उर्दू वाहिनीवरील चर्चेदरम्यान हिलाली माहिती देत होत्या. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज यांचे नेते अयाज सादिक यांच्या वक्तव्यानंतर हिलाली यांनी हा खुलासा केला आहे.