मुंबई – नव्या तिन्ही कृषी कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अधिकारांवर गदा येणार असल्याची स्पष्टोक्ती माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ऑनलाईन सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
नव्या कृषी कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर मोठा परिणाम होणार आहे. खासगी बाजाराकडून फी आकारणी, वाद निराकरण, ई ट्रेडिंग, कृषी-व्यापार परवाना अशा विविध गोष्टींवर त्याचा परिणाम होणार आहे. कषी आणि विविध कायद्यांमध्ये सुधारणा होणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रणालीतील सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य तो सकारात्मक युक्तीवाद व्हायला हवा. कुठलीही व्यवस्था कमजोर होता कामा नये, असे पवार यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1355457025237540872