मुंबई – युट्यूबप्रमाणे आता फेसबूकही व्हिडीयोच्या माध्यमातून त्याच्या युझर्सचा चार पैसे कमावण्याची संधी देणार आहे. फेसबुकने सांगितले की व्हिडीओ तयार करणाऱ्यांना जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर करून व्हिडीओ तयार करणाऱ्यांसाठी कमाईचे नवे मार्च तयार करण्याच्या योजनेचा विस्तार होणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतिने लोक फेसबुकवर कमाई करू शकतात, हेदेखील सविस्तर सांगितले.
कंपनीने म्हटले आहे की, ‘फेसबुकवर व्हिडीओ तयार करणारे आता एक मिनीटापर्यंतचा व्हिडीओ तयार करून पैसे कमावतील. त्यात कमीत कमी ३० सेकंदाची जाहिरात असेल. तीन मिनीट किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या व्हिडीओसाठी ४५ सेकंदांची जाहिरात असेल.’
विशेष म्हणजे पहिले केवळ तीन मिनीट किंवा त्यापेक्षा जास्त वेळाचा व्हिडीओ असेल तरच जाहिरातींच्या माध्यमातून लोक कमाई करू शकत होते. त्यात कुठलाही व्हिडीओ १ मिनीटाच्या आधी दाखविला जात नव्हता.
ही असेल अट…
फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्यात जाहिरात मिळावी असे वाटत असेल तर त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती किंवा अकाऊंटवरील व्हिडीओ ६ लाख मिनीटे बघितले गेले असावे. सोबतच या अकाऊंटवर किमान ५ किंवा त्यापेक्षा जास्त सक्रिय व्हिडीओ अपलोड असायला हवे, असे फेसबुकने म्हटले आहे.