नवी दिल्ली – अभिनेत्री अंकिता लोखंडे ही परखडपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. व्यक्तिगत असो की व्यावसायिक, कोणतीही गोष्ट ती स्पष्टपणे मांडते. अंकीताने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली. यात तिने आपल्याला कास्टिंग काऊचचा सामना कसा करावा लागला, हे सांगितले.
मी खूप स्ट्रॉंग आहे. एका मर्यादेपर्यंतच कोणालाही मी जवळ येऊ देते. तरीही १९, २० वर्षांची असताना मला कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले होते. तेंव्हा मी एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी गेले होते. भेटायला गेले असताना, मला थोडे कॉमप्रमाईज करावे लागेल, असे सांगण्यात आले. मी सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
पण जेंव्हा ते म्हणाले की, हे काम मिळवण्यासाठी तुला निर्मात्याची इच्छा पूर्ण करावी लागेल, तेंव्हा मात्र मी भडकले. तुम्हाला काम करण्यासाठी गुणी कलाकाराची नाही तर शय्यासोबत करणाऱ्या मुलीची गरज आहे, असे त्यांना सूनवुन मी तिथून निघून गेले. या घटनेनंतर त्यांना पश्चात्ताप झाला असावा, कारण त्यांनी माझी माफी मागितली. पण मी काम करण्यास नकार दिला, असे अंकिता सांगते. पण, या घटनेमुळे मला फार वाईट वाटले. काम मिळवण्यासाठी असे काही करावे लागणे, असे कोणते क्षेत्र असते का, असे मला वाटले.
या मुलाखतीत तिने सुशांतसिंग राजपूत सोबतची तिची लव्ह स्टोरी, तिचे ब्रेकअप याबाबतही अगदी मोकळेपणाने सांगितले.
सुशांतसिंग सोबत रिलेशनशिपमध्ये असताना अनेक बिग बजेट चित्रपट नाकारल्याचेही अंकिता सांगते. कारण मला सुशांतशी लग्न करायचे होते. अंकिताला हॅप्पी न्यू इयर, बाजीराव मस्तानी, रामलीला, सुल्तान आणि बदलापूर या चित्रपटांची ऑफर आली होती.