मुंबई – अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने प्रेग्नंट असतानाही शीर्षासन केले आहे. अर्थात त्यासाठी तिने पती विराटची मदत घेतली आहे. अनुष्कानेच यासंबंधीचा फोटो इन्स्टाग्रामला टाकून चाहत्यांना माहिती दिली आहे. स्वतःला फीट ठेवण्यासाठी ती योगासन करीत असल्याचे तिला यातून सांगायचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योगासने करीत आहे. शिक्षकांच्या देखरेखीतच मी आसने करीत आहे. भिंत आणि पती विराट यांच्या मदतीने शीर्षासन करता आले, असे अनुष्काने नमूद केले आहे. या फोटोची आणि तिच्या योगासनांची सध्या सोशल मिडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.