मुंबई – बॉलिवूडमधील ऑल टाईम सुपरहीट असलेला शोले चित्रपट उंचावर नेण्यात त्यातील भूमिका निभावणाऱ्या कलावंतांचे मोठे योगदान आहे. विरू असो वा जय, बसंती असो वा सूरमा भोपाली. चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही भारतीय प्रेक्षकांच्या मनात आहेत.
अमिताभ बच्चन सुरुवातीला या चित्रपटाचा भाग नव्हते, असे खुद्द अमिताभ यांनीच एका पुरस्कार सोहळ्यात अलीकडेच सांगितले. तेव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या. अमिताभ यांचा हा व्हिडीयो धर्मेंद्र यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटरून शेअर केला.
हा व्हिडीओ आयफाचा सोहळ्याचा आहे. यात अमिताभ बच्चन रंगमंचावरून धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलत आहेत आणि खुलासा करीत आहेत की धर्मेंद्र यांच्या शिफारसीमुळेच शोलेमध्ये आपल्याला जयची भूमिका मिळाली.
अमिताभ म्हणतात, ‘धर्मेंद्र यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचे आणि मनाला स्पर्शून जाणारे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे धर्मेंद्र हे एक दिलदार मित्र आहेत आणि खूप चांगला माणूस आहे. त्यांच्याशी तुम्ही कधीही भेटू शकता. मी आज धर्मेंद्र यांच्या बाबतीतील एक रहस्य तुमच्यापुढे उलगडणार आहे. धरमजी नसते तर मी कधीच शोलेमध्ये त्यांच्यासोबत काम करू शकलो नसतो. शोलेसाठी त्यांनीच माझ्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्याच हट्टासाठी रमेश सिप्पी यांनी मला त्या चित्रपटात संधी दिली. त्यानंतर काय घडले हे जगाने बघितले. त्यामुळे मी फक्त धरमजींचे आभारच व्यक्त करू शकतो.
https://twitter.com/aapkadharam/status/1371834376057716739