मुंबई – कोरोनावरील लशीच्या बाबतीत आधीच वेगवेगळ्या बातम्या पुढे येत असताना आता आणखी एक शक्यता पुढे आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जग या व्हॅक्सीनची (लस) प्रतिक्षा करीत असताना जगभरातील एक चतुर्थांश जनता या लशीपासून वंचित राहील, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
‘द बीएमजे’ नावाच्या जर्नलमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. व्हॅक्सीन वितरीत करणे हे व्हॅक्सीन तयार करण्यापेक्षा जास्त आव्हानात्मक ठरणार आहे. यात असेही म्हटले आहे की संपूर्ण जगात ३.७ अब्ज ज्येष्ठ नागरिक व्हॅक्सीन घेण्यास उत्सुक आहेत. अल्प तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या मागणीनुसार पुरवठा निश्चित करण्यासाठी निःपक्ष आणि न्यायसंगत धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे हे संशोधन म्हणते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल आफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी म्हटले आहे की जास्त उत्पन्न असलेल्या देशांनी पुरवठा निश्चित केला आहे. मात्र उर्वरित जगा व्हॅक्सीन पोहोचण्याच्या बाबतीत अद्याप अनिश्चितता आहे.
भारताला हवेत ८० हजार कोटी
पुणे येथील व्हॅक्सीन निर्माता सीरम इन्स्टिट्यूट आफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सतीश डी. रेवतकर यांनी म्हटले आहे की भारताला कोरोना व्हॅक्सीनच्या वितरणासाठी पुढील वर्षी ८० हजार कोटी रुपये लागतील. सीरम आक्सफोर्ड युनिव्हर्सिटी एस्ट्राजेनेकाद्वारा विकसीत व्हॅक्सीनला देशात कोविशिल्ड नावाने तयार करीत आहे. वीज पुरवठाही अखंडित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारण व्हॅक्सीनच्या सुरक्षेसाठी आवश्यक तापमान कायम ठेवणे गरजेचे आहे.