रायपूर (छत्तीसगड) – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढलेले आहे. त्यातच छत्तीसगड सरकारने एका अभियानांतर्गत ऑनलाईन शिक्षणाचा विस्तार केला आहे. ‘पढई तुंहर दुआर’ या कार्यक्रमांतर्गत हे सुरू आहे. येथील शिक्षकांनी तयार केलेल्या व्हीडीओच्या माध्यमातून केवळ भारतच नव्हे तर १६ इतर देशांमधील विद्यार्थीही शिकत आहेत.
राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. यात अमेरिकेसोबत पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, इराक, साऊदी अरब, युएई, तुर्की, ग्रीस, मलेशिया, फिलिपिन्स, कुवैत, लेबनान आणि श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. या वर्गांमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री, गणीत, वाणिज्य आणि इंग्रजी या विषयांचा सर्वाधिक समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.
राज्य सरकारच्या संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत आहेत. एससीईआरटीचे संयुक्त संचालक डॉ. योगेश शिवहरे यांच्यानुसार या उपक्रमांतर्गत ओपन फॉर आल आनलाईन वर्ग सुरू आहेत. वर्गात २२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यात सामील होण्यासाठी पहिले नोंदणी आवश्यक आहे. पोर्टलवर ज्या विषयाचा व्हीडीओ बघायचा असेल त्या विषयाचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यानंतर व्हीडीओचा एक्सेस दिला जातो.
रोज व्हीडीओ होतात अपडेट
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ४५ मिनीटांचे वर्ग चालतात. त्याचवेळी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नववी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह वर्ग होतात. त्यात मोटीव्हेशनल स्पीचही आयोजित केले जातात. दररोज हे व्हीडीयो अपडेट होत असतात.