गोकर्ण चहा!
गोकर्ण चहा … खूप मस्त लागतो चवीला. तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्यासोबत वापरून बनवल्यास आणखीनच खूप चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर बनतो. गोकर्णच्या फुला मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, मॅग्नेशियम, जस्त, मँगनीज, सोडियम आणि अँटी ऑक्साईड असते. ज्याचे शरीराला खूप जास्त फायदे होतात. जाणून घेऊ त्याची कृती आणि अनेक फायदे …
चहा बनवण्याची कृती
गोकर्णची फुले हलकेच धुवून घ्यावीत. फक्त फुले पाण्यात उकळून सुद्धा हा चहा बनवला जातो. परंतु त्याची उपयुक्तता आणखी वाढावी यासाठी त्यामध्ये तुलसी, पुदिना, आल्याची पाने उपलब्ध असल्यास अन्यथा आल्याचा एक तुकडा घातला तरी चालतो. गवती चहाची काही पाती आणि all spice चे एक दोन पाने घालावे. सर्व पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. एका पातेल्यात दोन कप पाणी घ्यावे. यामध्ये गोकर्णची फुले, पुदिना, तुलसी, आले, all spice आणि खडीसाखर एक छोटा खडा टाकून छान उकळून घ्यावे. २ कपचे एक कप पाणी करावे व गाळून घेऊन पिण्यास तयार होतो आरोग्यवर्धक गोकर्ण चहा.
गोकर्ण चहा चे फायदे
1_ नियमित सेवनाने थकवा दूर होतो .
2_ मानसिक ताण तणाव कमी करून डिप्रेशन कमी करण्यास मदत करतो.
3_रक्त साफ करण्यास खूप मदत होते .
4_त्वचेचे विकार या मुळे कमी होतात .
5_ पिंपल येणे कमी होते .त्वचा निरोगी राहते .
6_वजन कमी करण्यात मदत होते.
7_सर्दी खोकला या सारख्या विकारात खूप गुणकारी असतो हा चहा.
8_डायबेटिस च्या पेशंट ना खूप फायदेशीर असतो. शुगर कंट्रोल करण्यास मदत करतो.
9_स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
10_गोकर्ण चहा मध्ये कॅन्सर चे जिवाणू सुधा कमी करण्याची ताकत आहे .कॅन्सर रोखला जातो याचा नियमित सेवनाने.
11_संपूर्ण शरीर शुध्दी / बॉडी डिटॉक्स होते.
12_केसांच्या सर्व समस्या याच्या नियमित सेवनाने कमी होतात .
13_दिवस भराचा थकवा दूर होतो याच्या एक कप सेवनाने .
असे अनेक फायदे असणारा गोकर्ण चहा आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे . आणि आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे.
(संकलन :-डॉ .देवेंद्र खैरनार)