नाशिक – इच्छाशक्ती असेल तर अशक्यही शक्य होते. राज्य उत्पादनशुल्क विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी ऋषीकेश फुलझळके यांच्या माध्यमातून येत आहे. कोरोना झालेला असतानाही ते घरुनच मोठी कामगिरी बजावत आहे. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ऋषीकेश फुलझळके आणि त्यांचे संपूर्ण कुटूंबीय कोरोनाबाधित आहेत. होम क्वारंटाईन असतानाही ते कर्तव्य बजावत आहेत. सहकाऱ्यांच्या कामाचा आढावा आणि विविध कामगिरीचे मार्गदर्शन ते नियमीतपणे करीत आहेत. पाच जिह्यातील विस्तारात त्यांचे खबऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. खबऱ्यांकडून माहिती मिळताच ते कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सापळ्याची रचना करीत आहेत. तसेच मद्य तस्करांवर कारवाईचा धडाका त्यांनी लावला आहे.
दोन सापळ्यांमध्ये लाखोचे मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने रविवारी (दि.१८) मध्यरात्री हरसूल आणि पेठ या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून केंद्र शासित प्रदेशातून होणाºया मद्यतस्करीचा भांडा फोड केला. या कारवाईत चार जणांना बेड्या ठोकत पथकाने दोन महागडी वाहने आणि सुमारे ४३ लाख २१ हजाराचे बेकायदा मद्य हस्तगत केले आहे. यामुळे जिह्यातील बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्री चर्चेत आली असून, विशेष म्हणजे या कारवाईत काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेले दोन्ही संशयीत पुन्हा एक्साईज विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
अशी झाली कारवाई
दक्षेस इश्वरभाई हलपती (२३ रा.दमण),विजयकुमार जयरामभाई पटेल (४३ रा.करमाबिल्ला जि. बलसाड, गुजरात),जयेश भाई अरविंदभाई हलपती (३५ रा.सलवाहू कोलीवाडा ता.वापी,जि.बलसाड) व मिनेशकुमार कांतीलाल पटेल (३० रा.मदनफुलीया कुरगाम ता.वापी जि.बलसाड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. दीव दमन निर्मीत व राज्यात विक्रीस बंदी असलेला मोठा मद्यसाठा हरसूल आणि पेठ मार्गे राज्यात येणार असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक रूषीकेष फुलझळके यांना मिळाली होती. मात्र फुलझळके कोरोना या आजाराने त्रस्त असल्याने त्यांनी ही खबर वरिष्ठांना कळविल्याने केंद्र शासित प्रदेशातून होणारी मद्यवाहतूकीचा भांडाभोड झाला. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ,अधिक्षक डॉ.मनोहर अंचुळे,उपअधीक्षक भुतकर आदींच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पेठ रोडवरील बोरीचा पाडा आणि पेठ जोगमोडी रोडवरील कोपूर्ली शिवारात वेगवेगळे सापळे लावण्यात आले होते. बोरीचा पाडा शिवारातील नदीच्या पुलावरून भरधाव येणाºया स्कोडा कार (एमएच ०३ झेड ००३४) या कारला अडवित पथकाने दक्षेस हलपती आणि विजयकुमार पटेल यांना बेड्या ठोकल्या. कारच्या तपासणीत जॉन मार्टीन,रॉयल स्टॅग,रॉयल चॅलेंज,इंपेरिअल ब्ल्यू,किंगफिशर बिअर असा वाहनासह सुमारे १७ लाख २५ हजाराचा ऐवज जप्त केला.
कारमध्ये होता मद्यसाठा
कोपूर्ली शिवारातील नाल्याच्या पुलावर केलेल्या कारवाईत पथकाने शेवरोलेट कार (डीडी ०३ एस ००४५) अडवून जयेशभाई हलपती आणि मिनेशकुमार पटेल यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत कारसह २५ लाख ९६ हजाराचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. दोन्ही कारवाई प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ४३ लाख २१ हजार १९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याकारवाईत गेल्या चार पाच दिवसांपूर्वी पकडलेले दोन्ही पुन्हा एक्साईज विभागाच्या हाती लागले असून त्यांच्यावर एमपीआयडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान या प्रकराने परराज्यातील दारूस महाराष्ट्रात चांगलीच मागणी असल्याचे दिसत असून कर चुकवून आलेले बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कारवाईने मद्य तस्करीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे व दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते यांच्या नेतृत्वाखाली जवान गोकुळ शिंदे,लोकेश गायकवाड,विठ्ठल हाके,भाऊसाहेब घुले,युवराज रतवेकर आदींच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक पोटे करीत आहेत.