मुंबई – ख्यातनाम कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ हे लवकरच पुन्हा आई-बाबा होणार आहेत. गिन्नी प्रेग्नंनट असल्याची माहिती खुद्द कपिलनेच दिली आहे. कपिल शर्मा त्याच्या शो मधून लवकरच एक्झिट घेत आहे. काही काळासाठी ही एक्झिट असेल असे सांगितले जात आहे. आज त्याचे कारण स्पष्ट झाले आहे. कपिल शर्माने गिन्नीशी १२ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मुलगी झाली आहे. आता त्यांना दुसऱ्या अपत्याचे वेध लागले आहेत.
https://twitter.com/KapilSharmaK9/status/1354742757189795842