नवी दिल्ली – जगात अनेक देशात नानाविध प्रथा आढळून येतात. त्यापैकी काही प्रथा जाचक वाटतात तर काही हस्यास्पद असतात. उत्तर कोरियातील नागरिकांना आपल्या देशातील एखादा मोठा नेता मरण पावला तर रडावे लागते. तसा त्यांना आदेशच देण्यात येतो, अन्यथा मृत्यू दंडाचीच शिक्षा मिळते, त्यामुळे येथील लोक चक्क रडण्याची प्रॅक्टिस करतात.
जगात असा शक्यतो असा कोणीही माणूस नसावा की ज्याला उत्तर कोरियाचा ‘हुकूमशहा’ किम जोंग-उनला माहित नाही. किम जोंग त्याच्या आगळ्यावेगळ्या साहसांमुळे बर्याचदा चर्चेत असतो. तसेच उत्तर कोरिया हा अनेक गोष्टीत गुप्तता पाळणारा देश मानला जातो. कारण इथल्या गोष्टी क्वचितच बाहेरील जगापर्यंत पोहोचतात, मात्र किम जोंग यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्याची सर्व जगभर चर्चा होते.
उत्तर कोरियामध्ये त्याच्या मृत्यूनंतर राज्यकर्त्यासाठी रडण्याची प्रथा देखील आहे. जर कोणी ही प्रथा पाळत नाही तर किम कुटुंबियांकडून त्याला शिक्षा केली जाते.२०११ मध्ये किम जोंग इल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा किम जोंग उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता झाला. त्याचे आजोबा किम-सुंग ( द्वितीय ) हे उत्तर कोरियाचे संस्थापक आणि पहिले नेते होते, त्यांचे 1994 मध्ये निधन झाले. त्यानंतर किम जोंग उनचे वडील किम जोंग इल यांनी सत्ता हाती घेतली. उत्तर कोरियामधील प्रत्येक घरात किम जोंगच्या वडिलांचे आणि आजोबांचे फोटो ठेवणे बंधनकारक असल्याचे म्हटले जाते.
अशी आहे प्रथा
विशेष म्हणजे किम जोंग इलच्या निधनानंतर शोकसभेत प्रजेला उघडपणे रडण्याचा आदेश देण्यात आला. या शोकसभेत लोक ओरडले, रडले आणि त्यांनी छाती बडविली. परंतु जे लोक रडले नाहीत त्यांना दुसर्या दिवशी अदृश्य करण्यात आले. याबद्दल बरीच चर्चा झाली. राज्यकर्त्याच्या मृत्यूनंतर येथील जनतेला या शोकसभेमध्ये यावे लागले आणि जुन्या राजावर त्यांचे प्रेम आहे हे सिद्ध करावे लागले. ही शोकसभा म्हणजे रोना किम कुटुंबाशी असलेली निष्ठा असल्याचा पुरावाही होता.
१० दिवसांची शोकसभा
एका अहवालानुसार, ही शोकसभा १० दिवस चालली, जिथे प्रत्येकजण म्हणजे तरुण, मुले, वृद्ध, महिला आणि पुरुष यांना रडणे अनिवार्य होते. एवढेच नव्हे तर या शोकसभेच्या वेळी कोण योग्य रडत नाही, याकडेही लक्ष ठेवण्यात आले. सुमारे दहा दिवस चाललेल्या प्रत्यक्ष शोकसभेनंतर भाषणचे सत्र पार पडले, त्यात किम स्वत: उपस्थित होते. यात असे ठरले होते की, जे लोक रडत नाहीत त्यांना त्वरित ६ महिन्यांच्या कठोर कारागृहात ठेवण्यात यावे. त्यानंतर हजारो दोषींना रात्रीतून घराबाहेर नेण्यात आले. तसेच कमी रडण्यामुळे अनेकांचे संपूर्ण कुटुंब कित्येक महिने कामगार छावणीत राहिले.