नाशिक – यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तसेच २१ एप्रिल पर्यंत अनुक्रमे गुरु व शुक्राच्या अस्ता मुळे आता थेट २२ एप्रिल या दिवशी या वर्षातील पहिला विवाह मुहूर्त आहे. तर डिसेंबर पर्यंत एकूण ४० मुहूर्त आहेत. तशी माहिती पंडित दिनेश पंत यांनी दिली आहे.
पंत यांनी सांगितले की, डिसेंबर २० ते डिसेंबर २१ या काळात एकूण ४८ विवाह मुहूर्त आहेत. यावर्षीच्या लग्नसराई म्हणजे डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत या काळात जानेवारी फेब्रुवारी मार्च २०२१ या तीन महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्र या ग्रहांचा अस्त असल्याने लग्न मुहूर्त नाहीत. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२१ या काळात देखील लग्न मुहूर्त नाहीत. गुरू-शुक्राच्या अस्त काळामध्ये साखरपुडा, सुपारी फोडणे, लग्न निश्चित करणे असे विधी आपण करू शकतो. परंतु लग्न मात्र मुहूर्ताच्या तारखांना करावे लागेल. आपल्याकडील वधूवरांना त्यांच्या कुंडलीतील गुरुबळ चंद्रबळ, रवीबळ त्याचप्रमाणे एकमेकाच्या कुंडलीतील गुरु, शुक्र यांच्या शुभाशुभ परिणाम पाहून योग्य तो मुहूर्त व त्या मुहूर्ताची योग्य वेळ ज्योतिषांकडे जाऊन काढून घ्यावी, असे पंत म्हणाले.
यंदाचे विवाह मुहूर्त असे
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्त नाहीत.
एप्रिल
२२, २४, २५, २६, २७, २८, २९ व ३० एप्रिल
मे
१, २, ७, ८, ९, १४, १५ मे
जून
३, ४, १६, १९, २०, २२, २३, २४ जून
जुलै
१, २, ७, १३, १५
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर
१५, १६, २०, २१, २८, २९, ३० नोव्हेंबर
डिसेंबर
१, २, ६, ७, ११, १३,
विवाह मुहूर्त आणि गुरु -शुक्र ग्रहांचा संबंध
गुरु म्हणजे विवाह कार्यामधील प्रमुख ग्रह आहे. विवाह कार्यातील प्रत्येक विधीला गुरूचा आशीर्वाद असणे गरजेचे असते. गुरु हा पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करत असल्याने लग्नापूर्वी पिवळ्या रंगाची हळद लावली जाते. वधू तसेच वरा कडे परस्परांची ज्येष्ठ मंडळी हळद घेऊन येऊन ती वधू-वरांना लावतात. त्याचपद्धतीने विवाहातील अक्षतांना देखील हळद व कुंकू लावले जा.ते विवाहातील प्रत्येक विधीमध्ये गुरुचे प्रतिनिधीत्व करणारी हळद प्रामुख्याने वापरली जाते. विवाहाप्रसंगी गुरूचा आशीर्वाद लाभणे तसेच वधूवरांच्या कुंडलीतील गुरुबळ लाभणे हे प्रकारे दीर्घकाल वैवाहिक आयुष्याचे द्योतक मानले जाते. त्याचप्रमाणे शुक्र आग्रह वैवाहिक सुखाचा कारक असल्याने विवाह प्रसंगी शुक्राचा आशीर्वाद लाभणे हे दीर्घकालीन वैवाहिक सुखाचे प्रतीक मानले जाते. म्हणून विवाह प्रसंगी गुरु व शुक्र या ग्रहांचा आशीर्वाद लाभणे महत्त्वाचे असते..
विवाह मुहूर्त बाबत विशेष टीप-
गुरू व शुक्राचा अस्त जरी असला तरी ज्यावेळी गुरू किंवा शुक्राचा उदय काळात (जानेवारी ते मार्च तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर) या काळातील आपत्कालीन तसेच गौण काळातील विवाह मुहूर्त देखील अनेक पंचांगकर्त्यांनी पालकांच्या सोयीसाठी दिलेले आहेत. अशा मुहूर्ताचा वापरदेखील विवाहासाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.