नाशिक – या संकटकाळात जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आगामी सणांचे स्वरूप पाहता संसर्ग प्रसार गतीने होण्यास आपण कारण ठरू नये असे सर्व नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. आगामी होळी, रंगपंचमी व धूलिवंदनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचना केल्या आहे. त्याचप्रमाणे एक आदेशही काढला आहे.