इंदूर – छत्रपती शिवरायांपासून ते पेशवाईपर्यंत होळकर सरदारांचा पराक्रम सर्वांनाच माहित आहे. अशा या ऐतिहासिक होळकर घराण्यात गेल्या २५ वर्षांपासून वादविवाद होता. मात्र आता राणी शालिनी देवी पुन्हा ऐतिहासिक महेश्वर किल्ल्यात राहू लागल्याने या राजवाड्याची शान वाढली आहे. कारण राजा (प्रिन्स) शिवाजीराव होळकर आणि शालिनी होळकर यांच्यातील दुरावा दूर झाला आहे.
सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवाजीराव होळकर म्हणजेच प्रिन्स रिचर्ड यांच्यापासून वेगळ्या ठिकाणी राहात असताना राणी शालिनी देवी यांनी नर्मदा नदीच्या तटबंदीवर नवीन महाल उभारला होता. कोरोना काळामध्ये लॉकडाउन दरम्यान अनेक अडचणी वर मात करीत दोघांदरम्यानचा दूरवा मिटला आहे.
रिचर्ड यांचा जन्म व शिक्षण फ्रान्स मध्ये झाले असून तेथेच त्यांची ओळख शॉली (शालिनी) बरोबर झाली होती. त्यानंतर ते दोघे विवाहबंधनात बांधले गेले. परंतु काही वर्षांपूर्वी मतदानाचा हक्क प्रकरणातून दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. त्यामुळे शालिनी यांनी इंदूर राजधानी सोडली. परंतु राजधानी महेश्वर मधील लोकांबरोबर त्यांचा स्नेह कायम होता. काही काळ त्या आपल्या फार्म हाऊसमध्ये राहत असत. यादरम्यान लॉकडाउनच्या काळात परत राजवाड्यात येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तरीही त्या अद्याप आपल्या फार्म हाऊसमध्ये नेहमीत भेट देत आहेत.
रिचर्ड आणि शालिनी या दोन मुले असून मुलगी सबरीना आणि मुलगा आशीर्वाद हे दोन्ही विवाहीत आहेत. यापुर्वी लग्नकार्यात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत असत. वास्तविक प्रिन्स रिचर्ड यांचे नाव बाबासाहेब उर्फ शिवाजीराव होळकर असे आहे. रिचर्ड यांच्या मुलांच्या विवाह प्रसंगी अनेक राजकारणी, उद्योजक आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महेश्वर किल्ल्याची सुंदर सजावट करण्यात करण्यात आली होती, रिचर्ड यांचे देखील या किल्ल्यावर खूप प्रेम आहे आणि ते कधीही महेश्वर सोडत नाहीत.