नाशिक – कोरोनाच्या काळात आळस, नाकारात्म विचार यांमुळे आत्महत्येसारख्या समस्यांना बहुतांशजण बळी पडत आहे. अशा काळात योगा, मेडिटेशन फायदेशीर ठरत असल्याने अनेक जण त्याकडे वळाले आहेत. याच धर्तीवर नाशिकच्या सचिन जोशी यांच्यातर्फे ‘लाईफ चेंजिंग कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन स्वरूपात कार्यशाळा आयोजित केली जाणार असून यात शास्त्रीय पद्धतीने मेडिटेशनचे तंत्र शिकवले जाणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते १०.४५ यावेळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यात शारीरिक व मानसिक कौशल्य वाढण्याकडे भर दिला जाणार असून कार्यक्षमता, संघटन कौशल्य, मानसिक संतुलन, वक्त्वृत्व तसेच इतर अन्य कौशल्य सहज आत्मसात कारण्याची पद्धत सांगितली जाणार आहे. कोरोनाच्या काळात अनेकजण नैराश्याला बळी पडले असून भावनिक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेतून शिकवल्या जाणाऱ्या मेडिटेशन टेक्निकद्वारे चिंता, काळजी कमी होऊन आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी माहिती दिली जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा फायदेशीर ठरणार असल्याने एकाग्रता, अभ्यासातील गोडी, परीक्षेची भीती, अभ्यासाचा कंटाळा घालवणे असे बरेच प्रश्न सुटणार आहे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि मोफत कार्यशाळा असणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘फिरत्या शाळे’साठी मदत स्वरूपात प्रवेश फी आकारण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले आहे. वय वर्ष १२ पासून पुढे कोणीही यात सहभागी होवू शकते. https://imjo.in/SK6ZxG या लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करून आपले स्थान निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.