नवी दिल्ली – जपानमध्ये होंडा कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली अनोखी लेजेंड टेस्ला ही कार लॉन्च केली असून ती चालकाविना स्वत: चालविण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे ही कार महामार्गाच्या लेनवर सहजपणे चालू शकते आणि स्वतः पुढील वाहन पास करण्याचा आणि रस्ता बदलण्याचेही वैशिष्ट्य आहे, ज्याचा ड्रायव्हरला विचार करावा लागणार नाही.
होंडाची ही कार अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून त्यात अनेक सोयीची सुविधा पुरविल्या आहेत, यामुळे वाहन चालविणे देखील सोपे होते. या कारमध्ये एक खास स्टॉप फीचर देखील आहे, जेव्हा ड्रायव्हर कोणताही प्रतिसाद देत नाही, तेव्हा कार आपोआप थांबते. या कारची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुमारे वेगवेगळ्या 10 लाख चाचण्या केल्या आहेत.










