नवी दिल्ली – एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वाहननिर्मिती कंपन्यांनी वाहनांच्या किमतीत वाढ केलेली असताना काही कंपन्यांनी मात्र ग्राहकांना चांगलाच डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. जापानी वाहन कंपनी होंडा या महिन्यात आपल्या चारचाकींवर भरीव डिस्काउंट ऑफर देत आहे. यामध्ये होंडा अमेझपासून होंडा सिटीसारख्या एक्झ्युक्युटिव्ह कारचा समावेश आहे. चला तर बघूया कारच्या ऑफर्सबाबत…
होंडा अमेझ – भारतीय बाजारात होंडाची सर्वात स्वस्त समजल्या जाणा-या अमेझवर या महिन्यात तब्बल ३८,८५१ रुपयांचा फायदा होणार आहे. या कारच्या पेट्रोल मॉडेलवर (एसएमटीला सोडून) १७ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा १७,१०५ रुपयांच्या एक्सेसरिज १५ हजार रुपयांच्या एक्सचेंजवर बोनस दिला जात आहे. एसएमटी व्हेरिएंटवर कंपनीकडून २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा २३,८५१ रुपयांच्या एक्सेसरिज आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.
होंडा सिटी – होंडा कंपनीने बाजारात नुकतीच आपली प्रसिद्ध सेडान कार सिटीच्या नव्या पाचव्या जनरेशनला लॉन्च केले होते. खूपच आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेने नटलेल्या या कारवर कंपनीकडून पूर्ण १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर दिली जात आहे. सेडान कारच्या दोन्ही पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर ही ऑफर दिली जात आहे.
होंडा डब्ल्यूआर-व्ही – होंडाच्या प्रसिद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही डब्ल्यूआर-व्ही वर या महिन्यात ३२,५२७ रुपयांची बचत करू शकणार आहे. त्यामध्ये १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा १७,५२७ रुपयांची एक्सेसरिजसह १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही गाड्यांवर ही ऑफर लागू असेल.
होंडा जॅझ – कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक कारवर ३२,२४८ रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामध्ये १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट किंवा १७,२४८ रुपयांच्या एक्सेसरिजसह १५ हजारांचा एक्सचेंज बोनसही दिला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही गाड्यांवर ही ऑफर लागू असेल.
सूचना – होंडाच्या सध्याच्या ग्राहकांना ५ हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस देण्यात येत आहे. कारच्या डिस्काउंटबाबत देण्यात आलेली माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीच्या आधारवर आहे. देशातील वेगवेगळी ठिकाणे आणि डिलरशिपनुसार, त्यामध्ये बदल असू शकतो. अनेकदा डिलरशिप त्यांच्याकडून डिस्काउंट ऑफर देऊ शकतात.