अकोला – राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणार्या निकृष्ट जेवणावरून संबंधित ठेकेदाराला त्यांनी कथितरित्या कानशिलात लगावली. अकोल्याचे पालकमंत्री कडू यांनी सायंकाळी रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर ही घटना घडली.
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बच्चू कडू ठेकेदाराला श्रीमुखात भडकावत असल्याचे दिसत आहे. रुग्णालयातील कोविड रुग्णांसह इतर रुग्णांना दिल्या जाणार्या जेवणाची तपासणी त्यांनी केली. जेवणाची गुणवत्ता खराब असल्याने ते नाराज झाले. जेवणाची गुणवत्ता आणि इतर गोष्टींवर स्पष्टीकरण मागण्यासाठी त्यांनी ठेकेदाराला बोलावले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी कथितरित्या त्याच्या कानशिलात लगावली. खराब गुणवत्तेचे जेवण, रुग्णालयातील धान्य भांडार तसेच अन्नधान्य वितरणासंबंधित देखभाल न करण्याबाबत त्यांनी जिल्हा उपविभागीय अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले.
राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे काय? जेवणाच्या मुद्यावरून एक मंत्री सामान्य कर्मचाऱ्याला मारहाण कशी करू शकतो?
सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करा.— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) April 6, 2021