अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा
नाशिक ः जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत ११० व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेस पात्र असणाऱ्या सर्व नियमित व माजी उमेदवारांची, ११० व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस.भामरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. या परिक्षेचे हॉलतिकीट १ ऑगस्ट पर्यंत उपलब्ध होणार असून सर्व नियमित व माजी उमेदवारांनी परिक्षेच्या हॉल तिकीटाबाबत आपल्या आस्थापनेशी संपर्क साधावा. तसेच ११० व्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी ०२५३-२३६३४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.