नाशिक – नाशिक शहरातील हॉटेल व बारच्या वेळेबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मोठा खुलासा केला आहे. तो असा
—
हॉटेल व बार वर आठवडाभरासाठी वेळेचे बंधन आणि उपस्थितीचे सुद्धा ५० % चे बंधन आधीच घालण्यात आलेले आहे. त्यामुळे वेगळ्याने शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस बंद ठेवण्याची आवश्यकता तूर्त वाटत नाही. हॉटेलमध्ये व बारमध्ये जाण्याच्या वेळा सर्वसाधारणपणे संध्याकाळच्या असतात आणि त्यावर ५०% ची मर्यादा पूर्ण आठवड्यासाठी कायम करण्यात आलेली आहे. यासंदर्भात जर तेथेही सायंकाळी खूप गर्दी होत असल्याची बाब निदर्शनास आली तर त्याबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल. काल काढलेले आदेश हे अंतिम आदेश नसून एकूण निर्बंधांचा हा पहिला टप्पा आहे.. जसजसा अनुभव येईल तसे हे आदेश सुधारित केले जातील.
आदेश अत्यंत स्पष्ट असतानाही काही ठिकाणी मनाने वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. ही बाब अनावश्यक आहे.
दारूची दुकाने आठवडाभर सकाळी 7 ते सायंकाळी 7 सुरु राहू शकतील व इतर दुकानाप्रमाणेच शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद राहतील.
हॉटेल/बार ही वेगळ्या प्रकारची अस्थापना आहे.
ती आठवडाभर व शनिवारी रविवारी सुद्धा 50 टक्के क्षमतेने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक