अमर्याद संधी असलेले क्षेत्र
मंदीतही हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची जीडीपी मधील योगदान मोठ्या प्रमाणात वाढत असून आगामी वर्षात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी ही प्रचंड वाढणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट करण्याची संधी मिळावी या हेतूने महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेने नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १९९२ मध्ये समाजश्री प्रशांत दादा हिरे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सुरू झाले. ६० प्रवेश क्षमतेचे चार वर्ष बी.एच.एम.सी.टी पदवी, ६० प्रवेश क्षमतेचे बीएससी एचएस तीन वर्षे पदवी, ६० प्रवेश क्षमतेचे डिप्लोमा (पदविका) व तसेच २५ प्रवेश क्षमतेचे कुकरी बेकरी कन्फेक्शनरी, २५ प्रवेश क्षमतेचे हॉटेल ऑपरेशन, २५ प्रवेश क्षमतेचे हॉटेल मॅनेजमेंट.कोर्सेस साठी संस्थेची स्वतंत्र सुसज्ज अशी इमारत असून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र अशा वस्तीगृहाची उभारणी संस्थेने महाविद्यालयाच्या आवारात केलेली आहे.
या अभ्यासक्रमासाठी तज्ञ शिक्षक व इतर शिक्षक कर्मचारी यांच्या संस्थेने नेमणूक केली असून आज पाहता महाविद्यालयाचे निकालाची परंपरा ९५ टक्के पेक्षा अधिक असते, या पदवी,पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात व परदेशात नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकतात. जसे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शेफ, मॅनेजर, एअरलाईन्स, रिटेल मार्केटिंग प्रशासन सेवा एमपीएससी यूपीएससी परीक्षा देऊ शकतात. याशिवाय स्वतःचा हॉटेल किंवा केटरिंग व्यवसाय सुरू करू शकतात. विविध तयार खाद्यपदार्थांसाठी मोठी बाजारपेठेत उपलब्ध असल्याने अनेक करियरच्या उपलब्ध असून नंतर विद्यार्थी उच्च शिक्षण मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) सुद्धा करू शकतात.
बारावीत कुठल्याही शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो . बॅचलर हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद(ARCTE)मान्यता प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा तर्फे (MH-CET) परीक्षेला प्रविष्ठ होणे आवश्यक असते. चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सोबत ६ महिने औद्योगिक प्रशिक्षण घ्यावे लागते. तसेच बॅचलर इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मार्च मेरीट नुसार उपलब्ध असते. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी तीन वर्ष पदविका अभ्यासक्रम एम एस बी टी इ मान्यताप्राप्त आहे याशिवाय हॉटेल ऑपरेशन दहावीनंतर “हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी “सर्टिफिकेट कोर्सेस देखील उपलब्ध आहेत.
या सर्व शाखेचा अभ्यासक्रम कौशल्यावर आधारित असून यातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण दिले जाते . यात प्रामुख्याने विविध पदार्थ बनवण्याची कला, वाईन पेअरिंग, हॉटेल हाउसकीपिंग पाहुण्यांचे स्वागत संदर्भात संहिता अशा विविध कौशल्य शिकवले जातात.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पर्यटन, ट्रॅव्हल्स, फुड प्रोडक्शन होटेल ही क्षेत्रे वेगाने विस्तारित होत असल्याने भविष्यात रोजगाराच्या संधी वाढतील यात काही प्रश्न नाही, रोजगार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा निश्चितच फायदा होईल.