मुंबई – देशातील सर्वात मोठे कोविड सेंटर राजधानी मुंबईत साकारण्यात आले आहे. येथील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) हे सेंटर उभारण्यात आले आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे सेंटर तयार करण्यात आले असून येथे लसीकरणाची मोहिमही राबविण्यात येत आहे.
या सेंटरची वैशिष्ट्ये अशी…
– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केवळ १५ दिवसांत २०० आयसीयू बेड्स आणि १००० बेड्सची जम्बो सुविधा असलेले देशातील पहिले खुले कोविड सेंटर उभारले आहे.
– जुलै २०२० मध्ये येथे दुसरा टप्पा उभारण्यात आला होता. तत्पूर्वी साधारणत: एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले हाेते. त्यानंतर याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अतिरिक्त १२०० खाटांचे आयसीयु, डायलेसिसची सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले.
– मुंबई महापालिकेच्या वतीने या कोविड सेंटरमध्ये आरोग्य सेवा दिली जात आहे. अत्याधुनिक आयसीयू लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, विविध प्रकारचे व्हेंटिलेटर, प्रत्येक बेडसोबत मल्टिपॅरा मॉनिटरची सुविधा देण्यात आली. सर्व बेड्स सेंट्रल सर्व्हिलन्स सिस्टीमला जोडण्यात आले आहे.