मुंबई – जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची ठरू शकते. इथे आम्ही तुम्हाला रिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या प्रिपेड प्लानविषयी माहिती देणार आहोत. ज्यात तुम्हाला दररोजज हायस्पीड 2 GB डेटा मिळणार आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही प्रिमीयर एपच्या सबस्क्रिप्शनसोबत मिळणार आहे.
जिओचा २४९ रुपयांचा प्लान – जिओचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह मिळतो. यामध्ये युझर्सला दररोज 2 GB डेटासोबत १०० एसएमएस मिळतील. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळेल. याशिवाय जिओ प्रिमीयर एपचे सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येईल.
एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान – एअरटेलचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह मिळेल. यामध्ये युझर्सला १०० एसएमएस व 2 GB डेटा मिळेल. त्यासोबतच अनलिमीटेड कॉलिंगची सुविधा यातही असेल. इतर सेवांचा विचार केला तर अमेझन प्राईम, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्स्ट्रीमचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
व्होडाफोनचा ५९५ रुपयांचा प्लान – ग्राहकांना व्होडाफोन आयडियाच्या या रिचार्ज प्लानमध्ये १०० एसएमएस आणि 2 GB डेटा मिळेल. तसेच युझर्सचा अनलिमीटेड कॉलिंगची सुविधा असेल. याशिवाय लाईव्ह टीव्ही आणि झी ५ एपचे सबस्क्रिप्शनही देण्यात येईल. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे, हे महत्त्वाचे.
5G यावर्षी लॉन्च होणार नाही
सरकारने भारतात 5Gच्या संदर्भात एक मोठी माहिती जारी केली आहे. त्यात देशात यावर्षी 5जी लॉन्च होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात ही सुविधा यावर्षी शक्य होणार नाही, या विधानात सारेच काही आले आहे. त्यामुळे आता ही सुविधा २०२२ च्या सुरुवातीला भारतात येईल, असे चित्र आहे.