नवी दिल्ली – कोणालाही महागडा किंवा भारी स्मार्टफोन खरेदी करायचा असतो तेव्हा अॅपल, सॅमसंग सारख्या कंपन्यांच्या नवीन प्रीमियम स्मार्टफोनकडे ग्राहक धाव घेतो. साधारणत: प्रीमियम नवीन स्मार्टफोन २ ते ३ लाख रुपयांमध्ये खरेदी करता येतो. पण, जगात असे काही स्मार्टफोन आहेत ज्यांची किंमत ४ कोटीपेक्षा जास्त आहे. अशा जगातील सर्वात महागड्या फोनबद्दल संपूर्ण तपशील जाणून घेऊ या…
१) फाल्कन सुपरनोव्हा आयफोन ६
अॅपल फाल्कन सुपरनोव्हा आयफोन ६ स्मार्टफोनसाठी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या या फोनची रचना फाल्कनने केली आहे. जगातील सर्वात महाग आणि लक्झरी असा हा फोन आहे. हा आयफॅन ६ चे सुपर मॉडेल असून तो डायमंड्ससह २४ कॅरेट सोन्यापासून बनविलेला आहे, त्याचे कव्हर देखील सोने आणि प्लॅटिनमपासून बनविलेले असून त्याची किंमत ४ कोटी ८ लाख रुपये आहे.
२) आयफोन ४ एस एलिट गोल्ड
आयफोन ४ एस एलिट गोल्ड स्टुअर्ट ह्यूजेस यांनी डिझाइन केले आहे. त्यात सुमारे ५०० हिरे लावण्यात आले आहेत. हा फोन संपूर्णपणे २४ कॅरेटच्या गोल्डपासून बनविलेले आहे. त्याच मागील बाजूस अॅपलचा लोगोही ५३ हिरेंनी बनलेला आहे. प्लॅटिनममध्ये डायनासोर हाडांचा तुकडा देखील वापरला जातो. याची किंमत ९४ लाख कोटी रुपये आहे.
३) आयफोन ४ डायमन्ड रोझ :
आयफोन ४ डायमन्ड रोझ देखील स्टुअर्ट ह्यूजेसने बनविला आहे. यात सुमारे ५०० हिरे लावले आहेत. फोनच्या मुख्य बटण सुमारे ७.४ कॅरेटच्या हिऱ्यांनी बनलेले असून याची किंमत ८० लाख रुपये आहे.
४) गोल्डस्ट्राइकर आयफोन ३G जीएस सुप्रीम :
गोल्डस्ट्राइकर आयफोन ३G जी एस सुप्रीम हा स्मार्टफोन ब्रिटीश डिझायनर स्टुअर्ट ह्युजे आणि त्यांची कंपनी गोल्डस्ट्राइकर यांनी तयार केला आहे. यात २२ कॅरेट गोल्ड आणि २०० हिरे लावलेले आहेत. अॅपलच्या लोगोमध्ये देखील ५३ डायमंड आणि स्टार्ट बटणावर पूर्ण हिरा लावला आहे. याची किंमत ३२ लाख रुपये आहे.
५) आयफोन 3 जी किंग बटण :
ऑस्ट्रेलियन ज्वेलर पीटर आयलिसनने आयफोन ३G जी किंग किंग बटण फोन तयार केला आहे. त्याचे मुख्य बटण मोठ्या डायमंडने बनविले आहे. तसेच, १८ कॅरेट पिवळे, पांढरे आणि गुलाबी हिरे यात लावले असून १३८ हिरे फोनच्या बाजूच्या पट्ट्यात ठेवण्यात आले आहेत. याची किंमत २५ लाख रुपये आहे.