नवी दिल्ली – कुत्रा हा अनेकांचा प्रिय प्राणी असतो. अत्यंत प्रामाणिक असा हा प्राणी मालकाला जीव लावतो, आणि त्याचा चांगला मित्रही असतो. हा प्राणी खूप समजूतदार असल्याचं मानलं जातं. पण कुत्र्यांच्या काही प्रजाती अशा असतात ज्या खूप धोकादायक असतात. अशाच काही कुत्र्यांची ही ओळख.
रोटविलर्स
रोट्टवीलर्स प्रजातीचे हे कुत्रे जर्मनीत आढळतात. प्रचंड ताकदवान असतात हे कुत्रे, विशेषतः त्यांचे जबडे. संरक्षणासाठी याचा वापर होतो. मात्र, यांना अनोळखी लोक आणि दुसरे कुत्रे आवडत नाहीत.
पिट बुल्स
खतरनाक असले तरी हे कुत्रे कारणाशिवाय हल्ला करत नाहीत. पण यांचे मालक जर निष्काळजी असतील, त्यांची नीट काळजी घेत नसतील तर मात्र त्यांचा राग चांगलाच वाढतो. उलट जर यांची नीटपणे काळजी घेतली तर त्यांच्या मालकासोबत त्यांचे नाते अत्यंत प्रेमाचे आणि विश्वासाचे असते.
चौ चौ
हे कुत्रे दिसायला अत्यंत देखणे असतात, पण चांगलेच खतरनाकही असतात. त्यांची इच्छा नसेल तर त्यांच्या आसपास कोणीही फिरू शकत नाही. अत्यंत आक्रमक असलेले हे कुत्रे चीनमधील आहेत.
जर्मन शेफर्ड
या कुत्र्यांचे वजन फार नसते पण त्यांचा आत्मविश्वास आणि बेधडकपणा यासाठी हे कुत्रे प्रसिद्ध आहेत. पण हे कुत्रे आक्रमक होऊ नयेत यासाठी त्यांना कायम काही ना काही शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. राग आला तर मात्र हे कोणाचीही वाट लावू शकतात.
प्रेसा कैनारियो
कुत्र्यांची ही प्रजाती आफ्रिकेतील कॅनरी बेटा वर आढळतात. त्यांचे वजन ६० किलोच्या आसपास असते. या कुत्र्यांना शिकार तसेच हल्ला कसा करावा याचे प्रशिक्षण १८ व्या शतकात युद्धादरम्यान दिले जात असे. हे एवढे क्रूर आणि शक्तिशाली असतात की, त्यांच्या ताब्यातून सुटणे कठीण असते.