मुंबई – एकेकाळाची ड्रिम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्या हेमामालिनी हिचा वाढदिवस आज (दि. 16 ऑक्टोबर) साजरा होत आहे. हेमामालिनी तिच्या काळात इतकी सुंदर होती की तिला जो कोणी अभिनेता पाहत असे लगेच तfच्या प्रेमात पडत असे. त्यामुळे तिचे नाव मुंबईच्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी जोडले जात होते. अखेर हेमा यांनी धर्मेंद्रला त्यांचा जीवनसाथी बनविले, तरी त्यापुर्वी मात्र एका फोन कॉलमुळे तिचे जीवनाच बदलले, असे म्हटले जाते.
यासंबंधी एक किस्सा असा सांगण्यात येतो की, हेमा मालिनी जेव्हा ११ वीत शिक्षण घेत होती. तेव्हाच तिला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यामुळे मग अभ्यास सोडून तीने चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा विचार केला. 1974 दरम्यान, केवळ धर्मेंद्रच नव्हे तर आणखी दोन दिग्गज अभिनेते हे हेमाच्या प्रेमात पडले. संजीवकुमार आणि जितेंद्र अशी या दोन स्टारची नावे आहेत .संजीव कुमार हे हेमावर मनापासून प्रेम करीत होते. संजीव कुमारने आपल्या पालकांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन हेमा मालिनीच्या घरी पाठवले. आपल्या मुलीचे अद्याप लग्न करायचे नाही, असे सांगत हेमाच्या आईने या प्रस्तावास नकार दिला. त्यानंतर संजीव कुमारने आपला मित्र जितेंद्र याच्याशी हेमाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव दिला. जितेंद्रने देखील हेमाला समजावले, पण हेमा यांनी जितेंद्रला सांगितले की, तिला संजीवकुमार आवडतात,पण लग्न करू शकत नाही. यावेळी हेमाचा हा निर्णय ऐकून संजीवकुमार खूप दु: खी झाला. या
दु: खामध्ये संजीवने मद्यपान सुरू केले, असे सांगण्यात येते. यामुळे त्यांची तब्येतही खालावू लागली .
संजीव कुमार यांना नकार दिल्यानंतर जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात संबंध वाढू लागले. जितेंद्रचे हेमावरही प्रेम होते. एके दिवशी त्याने हेमाला प्रपोज केले. ‘दुल्हन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जितेंद्र आणि हेमा यांनी बराच वेळ एकत्र घालवला. शूटिंग संपल्यानंतर जितेंद्र आपल्या पालकांसह हेमाच्या घरी पोहोचला. धर्मेंद्रचा फोन आला तेव्हा त्यांची दोन्ही कुटुंबे बोलत होती. तो हेमावर रागावला आणि निर्णय घेण्यापूर्वीच तीने त्याला भेटायला हवे, असे म्हणाला .जितेंद्रला वाटले की, हेमा यांनी आपला निर्णय बदलू नये, म्हणून त्याने त्याच दिवशी तिरुपती मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. आत्ता नेमके काय करावे असा हेमा विचार करत होती, की फोन पुन्हा वाजला. यावेळी जितेंद्रची मैत्रीण शोभाचा फोन होतो. तिकडून तिने हेमाला सांगितले की, जितेंद्र सोबत लग्न करू नको! असे सांगितल्यानंतर हेमाचे जितेंद्रशी लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर मग 1976 मध्ये जितेंद्रने शोभाशी लग्न केले.
इकडे हेमा आणि धर्मेंद्रची प्रेमकथा अपूर्ण होती. हेमाच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. धर्मेंद्रचे लग्न करण्याच्या आणि प्रेमाच्या नात्यात अडथळा येत होता. दरम्यान, 1976 मध्येच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हेमा म्हणाली की, धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौरवर तिचे प्रेम आहे, पण ते धर्मेंद्रशिवाय जगू शकत नाहीत. प्रकाश कौर यांनी धर्मेंद्रला घटस्फोट देण्यास नकार दिला. अखेर काही कालावधीनंतर या दोघांनीही रीतीरिवाजांनुसार लग्न केले.