नाशिक – सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहांची आदलाबदल झाल्याची बाब समोर आली आहे. नाशिकच्या व्यक्तीचा मृतदेह जबलपूर (मध्यप्रदेश) येथे पाठविण्यात आल्याचे दिसून आले. ही बाब रुग्णवाहिका चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला फोन करुन सांगितले. त्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास चांदवड टोलनाक्याच्या ठिकाणी तो मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, याप्रकरणात सिव्हिल हॉस्पिटलची काहीच चूक नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नातेवाईकांनी योग्य जबाबदारी न सांभाळल्याने हा प्रकार घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.