मनमाड – सामाजिक आणि धार्मिक सलोख्याच्या केवळ गप्पा मारल्या जात असल्या तरी येथील जय बजरंग गणेश मंडळाने त्यांच्या कृतीतून अनोखा संदेश दिला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोहरम निमित्त मंडळाच्या मंडपात शरबत वाटप केले. ‘मजहब नहीं सिखाता आपस मे बैर रखना’ हेच मंडळाला अभिप्रेत आहे.
मनमाड शहरात विविध जाती-धर्माचे नागरिक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात. अनेक सार्वजनिक गणेश मंडळात तर मुस्लीम तरुण देखील असून ते खांद्याला खांदा लावून उत्सव साजरा करतात. हिंदू बांधवासाठी गणेशोत्सव तर मुस्लिमांसाठी मोहरमचा महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. मोहरमच्या दिवशी शरबत वाटण्याची प्रथा आहे. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आले. त्यामुळे शिवाजी चौकातील जय बजरंग गणेश मंडळाने मोहरम निमित्त मंडळाच्या मंडपात शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, मौलाना हाफिज अय्युब, गणेश कल्याणकर, सचिन परदेशी, सचिन गायकवाड, इलियास तांबोळी, जगन्नाथ शिंदे, शेर खान, रोहित राऊत, निखिल जाधव, पंकज परदेशी, चैतन्य परदेशी, महेश रंधे, सागर आहेर, पियुष परदेशी, गुड्डु जाधव, रोहित परदेशी, दुर्गेश परदेशी, छोटू शिंदे, ऋषिकेश हादगे, ऋषभ चौधरी, गणेश आहेर, रूद्र पाटेकर, सनी भालेराव, राहुल ललवाणी, ओम हादगे, तुषार परदेशी, सनी बाविस्कर आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.