शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हुश्श.. महाकाय बोट पुन्हा कालव्यात

by Gautam Sancheti
मार्च 30, 2021 | 3:06 pm
in इतर
0
IMG 20210330 WA0013

हुश्श.. महाकाय बोट पुन्हा कालव्यात

गेली सहा – सात दिवस आपण “Ever Given” नावाचे एक महाकाय जहाज सुएझ कालव्यात अडकले असल्याची बातमी ऐकत असाल. जगभरातील तंत्रज्ञांच्या दिवस-रात्र प्रयत्नानंतर, वाळूत रूतलेले हे जहाज सुखरूप पाण्यात आले आणि पुढे मार्गस्थ झाले. भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या बोटीवर असलेले २५ तंत्रज्ञ हे भारतीय होते आणि त्यांनीच ही कोंडी फोडली.
—
देवेंद्र गायधनी, नाशिक  (फर्स्ट इंजिनिअर, मर्चंट नेव्ही)
—
मराठी बांधवांसाठी मी या घटनेचे थोडे विस्ताराने विश्लेषण करतो..  तत्पूर्वी आपल्याला या जहाजाची थोडी माहिती देतो:  M.V Ever Given हे जहाज कंटेनर प्रकाराचे असून जगातल्या सर्वांत मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक आहे. ते अधिकतम २०,००० वर कंटेनर वाहून नेते. हे जहाज Shoei Kisen Kaisha नावाच्या जपानी कंपनीच्या मालकीचे आहे. जर्मनीची Bernhard Schulte Ship Management नावाची कंपनी तिचे  तांत्रिक व्यवस्थापन करते. हे जहाज जवळपास ४०० मीटर लांबीचे असून ६० मीटर रूंद आहे. आणि त्याचे एकूण वजन २,००,००० टन एव्हढे आहे. जहाजाला चालना द्यायला ७९,५०० अश्वशक्तिचे प्रमुख इंजीन आहे व त्याव्यतिरिक्त त्यावर वीज निर्माण करण्याची ४ छोटी  इंजीन्स आहेत. जहाजाचा ताशी वेग जास्तीत जास्त २२.८ नॉट्स म्हणजेच साधारण ४२.२ किलोमीटर प्रति तास एवढा आहे. जहाजाला बाजूंनी थोपावण्याकरिता दोन थ्रस्टर्सही योजिलेले आहेत.
असे हे महाकाय जहाज चीनच्या ‘तानजूंग पेलेपास’ नावाच्या पोर्ट वरून ‘रॉटरडॅम’ ला जाण्याकरिता निघाले होते. कन्टेनर प्रकारातल्या जहाजांचा वेग इतर जहाजांच्या तुलनेत जास्त असतो कारण त्यांना वेळ गाठायची घाई असते. अन्यथा त्यावरील नाशवंत माल खराब होण्याची शक्यता असते. आशियातून जहाजांना युरोपात जायला सुएझ कालव्यातून जावे लागते. ‘सुएझ कालवा’ हा लाल समुद्र ते भूमध्य समुद्राला जोडणारा मानवनिर्मित दुवा आहे. दररोज या कालव्यातून साधारण ९.६ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक होत असते. हा कालवा नसेल, तर भूमध्य समुद्रात माल  पोहोचविण्यासाठी  आफ्रिकेला वळसा घालावा लागेल, ज्यामुळे मालाला पोहोचायला ८-१० दिवसांची भर पडेल. (असा हा, इजिप्तची जगाला भेट असलेला १९३ किमी लांबीचा कालवा, साधारण १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे.)
तर Ever Given जहाजाने १९३ पैकी जवळपास १५१ किमी चा भाग ओलांडला होता. हा काळ सहारा वाळवंटातून मोठ्या प्रमाणात वाळूचे वादळं येण्याचा आहे. त्यामुळे सुएझ कालव्यात सुद्धा जोरदार वारे वाहात असतात. जहाजाने पुर्वेकडील मुखापाशी कालव्यातून जहाजाला मार्गदर्शन करणारा, सुरक्षित वाट काढून देणारा जो ‘पायलट’, त्याला बरोबर घेतले (हे बंधनकारक असते) आणि कालव्यात मार्गस्थ झाले. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे जहाज किनाऱ्यावर ओढले गेले. त्याला वाचवण्यासाठी जहाजाची दिशा बदलली गेली, पण त्यामुळे जहाज अधिक अस्थिर झाले व त्यानंतर एका मोठ्या वाऱ्याच्या झोतामुळे जहाज कालव्याच्या उत्तरेकडील तटाच्या रेतीत रुतले.
जगाची हवा तंग
जहाज अडकले आणि व्यापारी जगताची हवा तंग झाली. जसे जहाज रुतले, तसे त्याला परत पाण्यात तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले. जेथे तासाभराच्या विलंबाकरिता मोठा दंड भरावा लागतो, तिथे प्रयत्न करूनही जहाज हलेना, म्हणून ताबडतोब इजिप्तच्या “सॅल्वेज टग्ज” ( ‘टग’ ही एक ताकदवान इंजीन असलेली, जी ओढ-ढकल करण्याकरिता वापरली जाणारी एक बोट असते. ) आल्या व त्यांनी जहाजाला मोकळे करायची सुरूवात केली. दोन दिवस रात्रंदिवस प्रयत्न करून जहाज तसूभरही हलले नाही, तेव्हा नामांकित डच सॅल्वेज कंपनी ‘स्मिट सॅल्वेज बी.व्ही.’ ला पाचारण करण्यात आले व साधारण दहा टग्ज मिळून, जहाजाच्या चहुबाजूंनी अतिशय कौशल्याने ओढत वा धक्का देऊ लागल्या.
जहाजाच्या बलबसबोव्ह (जे पुढचं टोक) खालची वाळू किनाऱ्यावर टाकली जाऊ लागली. यात साधारणपणे ३०,००० घनमिटर वाळूचा उपसा केला गेला. जहाजावरील अतिरिक्त पाणीसाठा (जो पिण्याकरिता व वजन कायम ठेवण्याकरिता (बलास्ट) म्हणून वापरतात) बाहेर ओतला जाऊ लागला. जहाज हलके केले जाऊ लागले. एव्हाना कालव्याच्या दोन्ही बाजूंना मिळून ३२० जहाजं अडकून पडली होती. परवाची पौर्णिमा भरती घेऊन येणार होती. भरतीने पाण्याचा स्तर वाढणार होता… आणि तब्बल ५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जहाजाला कालव्याच्या समांतर वळवण्यात यश मिळाले. पण अजूनही जहाज पूर्णपणे तरंगले नव्हते. सरतेशेवटी काल सकाळी जहाज पाण्यावर तरंगले आणि सर्व जगताने सुटकेचा निःश्वास टाकला.

IMG 20210330 WA0015

जगातील साधारण ९०% व्यापार हा समुद्र मार्गे होत असतो. थांबलेला व्यापार, त्यातून हल्लीचा जागतिक महामारीचा काळ. भारत दररोज अर्धा मिलियन बॅरल्स कच्च्या तेलाची आयात करतो व त्याच्या शुद्धीकरणातून मिळालेल्या तयार मालाची (साधारण २,००,००० बॅरल्स ची) निर्यात करतो. भारतात येणारे हे कच्चे तेल सुएझ कालव्यातून येते. याव्यतिरिक्त सिरीया देशात तेल न पोहोचल्याने तेलाचे भाव कडाडले. जागतिक तेलाच्या किमती ३% वाढल्या ( कालवा मोकळा झाल्याचे कळताच ३.५% कमीही झाल्या). युरोपात ताज्या फळांचा व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. समुद्री व्यापार वरकरणी किनाऱ्यावर दिसत नाही, पण तो थांबल्यावर त्याचे थोडे काय होईना महत्व जगताला कळाले.
या जहाजावरचे सर्व कर्मचारी भारतीय आहेत. “जागतिक वाणिज्य सामुद्रिकी मध्ये भारताचे निर्विवाद वर्चस्व आहे.” भारतीयांच्या नैपुण्याला जगाने प्रमाणित केले आहे. जहाजाला परत तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न हे डच सॅल्वेज कंपनी इतकेच किंबहुना जास्तच आहेत. जागतिक व्यापार स्तब्ध झालेला असताना हरक्षणीं वाढणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणावर मात देत, दिवसरात्र अथक परिश्रम करून कालवा मोकळा करणाऱ्या सर्वच बहाद्दरांचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

IMG 20210330 WA0014

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोनाबाधित

Next Post

नाशिकसह नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीचा आराखडा तयार करा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
1 1 7 1140x570 1

नाशिकसह नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीचा आराखडा तयार करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011