मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या राज्यातील पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व पक्षांचे नेते उपस्थित झाले होते. फोर्टमधील महात्मा गांधी मार्ग येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीच्या समोर हा पुतळा साकारण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते


फोटो – एएनआय, आदित्य ठाकरे आणि वकील सुधीर सूर्यवंशी यांच्या सौजन्याने









