नवी दिल्ली – डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने अनेक सरकारी सुविधांचे ऍप्स लाँच केले. आपल्या देशाला डिजिटली स्वयंपूर्ण करण्यासाठी ही ऍप्स तयार करण्यात आली आहेत. यातीलच काही खास ऍप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल.
MParivahan
या ऍपच्या साहाय्याने युझर आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सची डिजिटल कॉपी घेऊ शकतात. आपल्या दुचाकी किंवा चारचाकीची नोंदणी करू शकतात. सेकंड हँड गाडीची माहिती देखील इथे मिळेल. आणि ज्यांना आपली गाडी विकायची आहे, ते आपले वय आणि गाडीची माहिती येथे देऊ शकतात.
My Gov
सरकारच्या अत्यंत उपयोगी ऍपपैकी हे एक ऍप आहे. या ऍपच्या माध्यमातून युझर्स कोणताही विभाग किंवा मंत्रालयाला सूचना करू शकतात. गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड करता येते.
Aarogya Setu
आरोग्य सेतू हे ऍप खास करून कोरोना काळात लाँच करण्यात आले. कोरोना झालेल्या व्यक्तीची माहिती देत, हे ऍप संबंधित युझरला त्याच्या संपर्कात येण्यापासून वाचवते. आपल्या आसपास किती संक्रमित आहेत याच माहितीही यातून मिळते. कोरोना लसीकरणाची नोंदणीही आता यावर उपलब्ध आहे.
UMANG
या ऍपमध्ये तुम्हाला एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड, पॅन, आधार, डिजीलॉकर, गॅस बुकिंग, मोबाईल आणि विजेचे बिल भरण्याची सोय उपलब्ध होईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच राष्ट्रीय इ गव्हर्नन्स विभागाने मिळून हे ऍप लाँच केले आहे.
MPassport
या ऍपद्वारे तुम्ही पासपोर्ट संबंधीची सगळी माहिती मिळवू शकता. पासपोर्टसाठीचा अर्ज, त्याची केंद्रे आणि अन्य आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.