मुंबई – झी मराठी या वाहिनीवरील रात्री ८ वाजता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको किंवा तुझ्यात जीव रंगला यापैकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, ८ वाजता येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सुरू होणार आहे. येत्या ४ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार ही मालिका असणार आहे.
सध्या नव्या मालिकेऐवजी बंद कोणती मालिका होणार याचीच चर्चा सुरू आहे. तूर्तास नव्या मालिकेचा प्रोमो मात्र सर्वांना पाहता येणार आहे.
बघा हा प्रोमो