नवी दिल्ली – बजाज ऑटोने आपली सर्वात स्वस्त एबीएस प्लॅटिना 110 मोटरसायकल बाजारात आणली. यामध्ये चालकाच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली असून वेगवान आणि संतुलित ब्रेकिंग करून राईडला अधिक सुरक्षित बनविण्यात आली आहे. एबीएस प्लॅटिना 11O ही वैशिष्ट्यपूर्ण मोटरसायकल आहे. काय आहे हीचे वैशिष्ट्य जाणून घेऊ या…
१) एबीएस प्लॅटिनामध्ये 240 मिमी फ्रंट डिस्क ब्रेकसह नवीन अँटी-लॉक ब्रेकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर देखील लावले केले गेले आहे, जे मोटारसायकलचे संतुलन बिघडू न देता अचानक ब्रेक लावले तर टायरचे संरक्षण करते आणि वेगाच्या प्रक्रियेस नियंत्रित करते. त्यामुळे सुरक्षित प्रवासाचा अनुभव येऊ शकतो.









