मुंबई – एचटीएल टेक्नोलॉजीज या प्रसिद्ध आयटी कंपनीच्या रोशनी नादर मल्होत्रा यांनी देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहेत. त्यांच्याकडे, 54,850 कोटींची संपत्ती आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बायकॉनची किरण मजूमदार शॉ असून त्यांच्याकडे 36,600 कोटींची संपत्ती आहे.
हुरुन इंडिया आणि कोटक वेल्थ यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार, 100 अतिश्रीमंत (धनकुबेर ) यांच्या यादीमध्ये 31 महिला ‘स्वयं-निर्मित’ श्रेणीत आहेत, ज्यांची निव्वळ संपत्ती किमान 100 कोटी रुपये आहे. यात सहा व्यावसायिक व्यवस्थापक आणि 25 उद्योजकांचा समावेश आहे. यात शॉ ‘सेल्फ मेड मेड’ प्रकारात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ झोहोच्या राधा वेंभू हे 11,590 कोटी रुपयांच्या संपत्तीसह आहेत. या यादीमध्ये जयश्री उल्लाल तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 10,220 कोटी रुपये आहे. या अहवालानुसार या यादीमध्ये समाविष्ट महिलांचे सरासरी वय 53 वर्षे आहे. त्याच वेळी, 40 वर्षाखालील 19 महिला आहेत. या यादीमध्ये नायकाच्या फाल्गुनी नय्यरचा समावेश आहे. त्यांची मालमत्ता 5,410 कोटी रुपये आहे. यात बिजूच्या दिव्या गोकुळनाथचा समावेश आहे. त्यांच्याकडे 3,490 कोटींची संपत्ती आहे.
विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये काही कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला उद्योजकांचा समावेश आहे. या यादीमध्ये अपोलो हॉस्पिटल एन्टरप्राइझच्या चार महिला आणि गोदरेज ग्रुपच्या तीन महिलांचा समावेश आहे. या अहवालानुसार या यादीतील श्रीमंत महिलांमध्ये फार्मास्युटिकल व्यवसायाशी संबंधित 13 महिला, वस्त्रोद्योग व वस्त्र उद्योगाशी संबंधित 12 महिला आणि आरोग्याशी संबंधित नऊ महिलांचा समावेश आहे.