नवी दिल्ली : रेनो क्विड कंपनीची नवीन कार ही भारतातील लोकप्रिय आणि स्वस्त एंट्री लेव्हल कार होऊ शकते, कारण तीचे नवीन इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या या कंपनीने क्विडचा इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे. या नवीन कारची २०२१ मध्ये अधिकृतपणे पूर्व बुकिंग सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे कार फक्त पाच तासात चार्ज केली जाईल.
सुरुवातीला ही इलेक्ट्रिक कार सार्वजनिक सेवे करिता उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानंतर ही कार खासगी ग्राहकांना विक्रीसाठी बाजारात येणार आहे. सध्या युरोपियन बाजारात क्विड कार बाजारात आणली गेली आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि २.६ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक असेल. या कारची ड्रायव्हिंग रेंज चांगली असून इलेक्ट्रिक हॅचबॅक डब्ल्यूएलटीपीनुसार २९५ किलोमीटरची श्रेणी देण्यास सक्षम आहे. या कारची टॉप स्पीड १२५ कि.मी. प्रतितास आहे. ही कार अत्यंत कमी वेळेत चार्ज केले जाऊ शकते. २.३ केडब्ल्यू घरगुती सॉकेटद्वारे चार तासांपेक्षा कमी वेळात क्विडचा इलेक्ट्रिक इव्हॅटार पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो. त्याच वेळी, ते ७.७ किलोवॅट वॉलबॉक्स चार्जरमार्फत पाच तासात वॉलबॉक्स चार्जरद्वारे पूर्णपणे चार्ज होऊ शकते.