नवी दिल्ली – तुम्ही कॉफीप्रेमी आहात का? तर मग तुम्हाला निश्चितच ही कॉफी कोणती हे माहीत असेल. सिव्हेट ही ती कॉफी आहे. सिव्हेट हे एका मांजरीच्या प्रजातीचे नाव असून या मांजरीच्या विष्ठेपासून कॉफी तयार केली जाते.
दलमा आणि घटशीला येथील जंगलात हा दुर्मिळ प्राणी सापडतो. श्रीलंका, आफ्रिकेशिवाय दक्षिण भारताच्या जंगलातही आढळते. याच मांजरीच्या विष्ठेपासून कॉफी तयार केली जाते.
१ पौंड म्हणणेच ४५३ ग्रॅम कॉफीची किंमत जवळपास ४० ते ५० हजार एवढी आहे. म्हणजे एका किलोची किंमत चक्क लाखाच्या घरात आहे.
या मांजरीच्या अंगातून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधाने तिला कस्तुरी मांजरही म्हटले जाते. या मांजरींच्या शरीरात एक ग्रंथी आहे. यातून पिवळ्या रंगाचा घट्ट पण सुगंधी असा द्राव निघत असतो. याला कस्तुरीसारखा सुगंध येत असतो. यापासून बनवले जाणारे अत्तरही महाग असते.
कशी तयार होते कॉफी?
जंगलात मिळणारी कॉफी आणि चेरीची फळे सिव्हेट मांजर खाते. यातील गर मांजरी पचवतात, पण त्याची बी विष्ठेद्वारे बाहेर टाकली जाते. विष्ठेतून बी बाहेर काढून त्यावर प्रक्रिया केली जाते. बी धुवून पावडर करून कॉफी बनवली जाते. या सिव्हेट कॉफीला सौदी अरेबिया, दुबई, अमेरिका, युरोप येथे खूप मागणी आहे.
सिव्हेट मांजर हा दुर्मिळ प्राणी आहे. दलमाशिवाय जमशेदपूरच्या डोंगररांगांमध्ये ही मांजर जखमी अवस्थेत सापडली होती. तिला तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आहे. पण आता तिची तब्येत व्यवस्थित असून तिला टाटांच्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे.