नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या “अभिकल्प ” स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन दशेपासून च संशोधनाची आवड निर्माण होणे ही सध्या कालची गरज असून त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील औषधनिर्माण क्षेत्रा मधील उपयुक्त संधीचा लाभ घेत नवीन शोध निर्मिती साठी विशेष प्रयत्न करावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटर अंतर्गत “अभिकल्प” ही विद्यापीठस्तरीय स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या अभिकल्प स्पर्धेत, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित “समाजश्री प्रशांत दादा हिरे” फार्मसी कॉलेज मालेगाव, येथील अंतिम वर्षांमध्ये शिकणारे अहिरे उमेश आणि नम्रता अमृते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘अभिकल्प ‘ या स्पर्धेत सहभाग घेतला. “Formulation and evaluation of herbal lipstick” या विषयावरील प्रकल्प त्यांनी सादर केला. यावेळी त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठातर्फे त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. यासाठी त्यांना महाविद्यालयाच्या एल.पी.देवरे, डॉ. डी. जी. बच्छाव, शाहिद कुरैशी यांच्या मार्गदर्शन लाभले. या यशासाठी संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या.